
महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना नवी मुंबई येथे समोर आली असून सीवूड परिसरात बेकायदा पद्धतीने चालणाऱ्या एका आश्रमावर कारवाई केल्यानंतर तिथे एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलेला आहे. सदर प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आश्रम चालकाला बेड्या ठोकलेल्या आहेत.
सेक्टर 48 येथे एक विनापरवाना आश्रम सुरू आहे त्यावर काही दिवसांपूर्वी महिला आणि बालविकास विभागाने कारवाई केली होती. आश्रमचा चालक असलेला राजकुमार येसुदासन याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सदर ठिकाणी पंचेचाळीस मुले-मुली आश्रमात राहत होते. उल्हासनगर येथील सुधारगृहात त्यांना आणण्यात आल्यानंतर त्यांची चौकशी केली त्यावेळी एका अल्पवयीन मुलीने आपले लैंगिक शोषण झाल्याची तक्रार दिली असून त्यानुसार राजकुमार येसुदासन याला अटक करून त्याच्याविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत कारवाई केली जाणार आहे.