
नगर जिल्ह्यात श्रीरामपूर शहरातील एका शालेय विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याप्रकरणी दोन शिक्षकांना जबाबदार धरून त्यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. शारीरिक व्यंग याबद्दल या विद्यार्थ्याला शिक्षकांकडून टोमणे देण्यात येत होते असा आरोप पालकांनी केला असून इयत्ता नववी मधील विद्यार्थ्याने आत्महत्या केलेली होती. काही दिवसांपूर्वी त्याचा पाय मोडला होता म्हणून शिक्षकांकडून त्याला टोमणे मारण्यात येत होते असेही पालकांचे म्हणणे आहे.
अथर्व असे या मुलाचे नाव असून त्याने त्याच्या राहत्या घरी गळफास घेतला होता. त्याची आई ह्या देखील त्याच्या शाळेच्या शिक्षिका असून वडील दुसर्या एका शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आपल्या मुलाला संशयित असलेल्या दोन शिक्षकांनी त्याच्या शारीरिक व्यंग यावरून टोमणे मारले त्यातून त्याने आत्महत्या केली असे त्याची आई जयश्री लोहकरे यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. अभिजीत शशिकांत सराफ आणि भूषण प्रभाकर साठे अशी दोन संशयित आरोपी शिक्षकांची नावे असून न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे.