अखेर ‘ त्या ‘ बालकाचा मृतदेहच आला हाती , संशयित म्हणाले की..

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना परभणी जिल्ह्यात समोर आलेली असून खंडणी दिली नाही म्हणून एका 14 वर्षीय बालकाचे अपहरण करून त्याचा नांदेड येथे अखेर खून करण्यात आलेला आहे. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळाकोळी येथील शिवारात तलावात या बालकाचा मृतदेह आढळून आलेला आहे. मयत बालकाचे हातपाय दोरीने बांधलेले होते तसेच गळ्याला देखील दोरी बांधलेली होती.

उपलब्ध माहितीनुसार , परमेश्वर प्रकाश बोबडे असे या बालकाचे नाव असून तो परभणी शहरातील रहिवासी आहे. 7 सप्टेंबर रोजी अज्ञात व्यक्तींनी त्याचे अपहरण केलेले होते. परभणी जिल्ह्यातील नवा मोंढा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला होता. पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतलेले होते त्यावेळी त्यांनी या मुलाचा खून करून मृतदेह तलावात टाकून दिलेला आहे याची माहिती पोलिसांना दिलेली होती.

आरोपींनी दिलेल्या कबुलीप्रमाणे त्यांनी 50 लाख रुपयांच्या खंडणीसाठी या बालकाचे अपहरण केलेले होते मात्र खंडणी मिळाली नाही म्हणून अखेर त्याची हत्या केली असे त्यांनी सांगितलेले असून परभणीच्या नवीन मोंढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर टी नांदगावकर , पोलीस अंमलदार नागनाथ मुंडे आणि पंकज उगले यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन मुलाचा मृतदेह तलावातून बाहेर काढलेला आहे.


Spread the love