अखेर ‘ त्या ‘ मृतदेहाचे रहस्य उलगडले , सत्य समजताच पोलिसही हादरले..

Spread the love

देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत असून अशीच एक घटना राजस्थान इथे समोर आली आहे . एका व्यक्तीचा जंगलात मृतदेह आढळून आला होता त्याचे रहस्य उलगडण्यात पोलिसांना यश आले असून हा खून चक्क त्याच्या भावानेच केल्याचे समोर आले आहे. लहान भावाचे मोठ्या भावाच्या पत्नीसोबत अनैतिक संबध होते त्यातून मोठ्या भावाने आपल्या मित्राला हाताशी घेत हे कृत्य केल्याचे समोर आले आहे .

माध्यमात आलेल्या वृत्तानुसार , आरोपी वसीम आणि त्याचा मृत भाऊ नसीमसहीत तीन भावांचं लग्न अलवर जिल्ह्यातील मूसेपूर गावातील तीन बहिणींसोबत झालं होतं पण मृत नसीमचं त्याच्या मोठ्या वहिनीसोबत अनैतिक संबंध होते. तिन्ही भाऊ ट्रक चालवून परिवार चालवत होते मात्र याच दरम्यान वसीम याच्या बायकोसोबत दीर असलेल्या नसीम याचे संबध सुरु झाले आणि याची खबर मोठ्या भावाला लागली आणि त्याने त्याला संपवण्याचा प्लॅन केला.

आरोपी वसीम याने आपल्या लहान भावाला जंगलात नेऊन चाकू आणि काठ्यांनी मारून त्याचा जीव घेतला. जेव्हा मृत भावाला दफन केलं जात होतं तेव्हा आरोपीने मी त्याची हत्या केली असं सर्वांसमोर सांगितलं आणि त्यानंतर या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. चौकशीनंतर पोलिसांनी हत्येत सहभागी आरोपींना अटक केली आहे.

पोलीस अधिक्षक देवेंद्र कुमार विश्नोई म्हणाले की, नसीम नावाच्या व्यक्तीचा मृतदेह जंगलात पडलेला असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर मृत व्यक्तीच्या परिवाराने तक्रार दाखल केली की, मृत व्यक्तीच्या मोठ्या भावाने आपला मित्र राशिदसोबत मिळून लहान भाऊ नसीमची हत्या केली. मृत व्यक्तीचे त्याच्या वहिनीसोबत अनैतिक संबंध होते. ज्यामुळे मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केली. पोलिसांनी हत्येप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे.


Spread the love