अखेर ‘ त्या ‘ सासू सासऱ्यांवर आणि पतीवर गुन्हा दाखल , पुण्यातील प्रकरण

Spread the love

तीन दिवसांपूर्वी आळंदी येथील प्रियंका अभिषेक उमरगेकर या नवविवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सदर प्रकरणी तिच्या पतीसह सासू आणि सासरे यांच्यावर आळंदी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. दहा तारखेला हा प्रकार घडला होता. सदर प्रकरणी अनिल अभिमान घोलप ( वय 45 राहणार निगडी ) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी भाजपच्या माजी नगराध्यक्षा वैजयंता अशोक उमरगेकर- कांबळे, माजी नगरसेवक अशोक भगवान उमरगेकर, प्रियंकाचा पती अभिषेक अशोक उमरेकर ( सर्वजण राहणार आळंदी ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मयत प्रियंका ही पिंपरी-चिंचवडच्या माजी नगरसेविका कमल अनिल घोलप यांच्या कन्या होत्या अवघ्या काही महिन्यापूर्वी त्यांचा विवाह संपन्न झाला होता . लग्नात प्रियांका हिला माहेरून चक्क बीएमडब्लू गाडी देण्यात आली होती मात्र त्यानंतर देखील सासरच्या मंडळींकडून फर्निचर घेऊन द्यावे म्हणून तिला त्रास दिला जात होता असे वडिलांचे म्हणणे आहे.

काय आहे प्रकरण ?

प्रियांका घोलप ( माहेरचे नाव ) आणि अभिषेक उमरगेकर यांचा 16 नोव्हेंबर 2021 रोजी विवाह झाला होता. प्रियंका आणि अभिषेक यांच्यात किरकोळ वाद झाला अन मी आता आत्महत्या करते अशी देखील प्रियांकाने धमकी दिली आणि त्यानंतर बेडरूमध्ये जाऊन 8 वाजण्याच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केली . पोस्ट मार्टेम रिपोर्टमध्ये देखील तिने गळफास घेतल्याचे स्पष्ट झालेले आहे. प्रियांका ही पिंपरी-चिंचवडमधील माजी नगरसेविका कमल घोलप यांची कन्या असून प्रियांकाच्या आत्महत्येने उमरगेकर आणि घोलप कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून अवघ्या नऊ महिन्यापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता.


Spread the love