
पुण्यात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून आलिशान फॉर्च्युनर गाडी घेऊन दाजी आणि मेहुणी यायचे आणि त्यानंतर चोरी करून पसार व्हायचे. लक्ष्मीपूजनासाठी बाहेर काढलेल्या हिरेजडित दागिन्यांवर डल्ला मारून हे बंटी बबली फरार झालेले होते. त्यांच्याकडून तब्बल एक कोटी 13 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, राजू दुर्योधन काळमेध (वय 45 ) आणि सोनिया श्रीराम पाटील ( वय 32 दोघेही राहणार वडगाव बुद्रुक ) अशी आरोपींची नावे असून नात्याने ते दाजी आणि मेहुणी आहेत. दोघेही उच्चशिक्षित परिवारातील असून अनेक ठिकाणी त्यांच्या प्रॉपर्टी देखील आहे.
तक्रारदार व्यक्ती हे व्यवसायाने आर्किटेक्ट असून कर्वेनगर परिसरातील असलेल्या बंगल्यात त्यांनी लक्ष्मीपूजनासाठी सोन्या-चांदीचे दागिने काढलेले होते. पूजा झाल्यानंतर ते बाणेर येथील त्यांच्या मुलाकडे गेले मात्र सत्तावीस तारखेला परत आले त्यावेळी दागिने गायब झाले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी आढळून आले त्यानंतर पोलीस नाईक सागर केकान, धीरज पवार आणि नितीन राऊत यांनी आरोपींची ओळख पटवत त्यांना ताब्यात घेतले आहे.