अखेर भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याचा मृतदेह आला हाती , मुख्य संशयित फरार

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून नागपूर येथून आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या भाजपच्या पदाधिकारी सना खान यांची अखेर हत्या झाल्याचे समोर आलेले आहे. सदर प्रकरणी जबलपूर येथील गुंड असलेला पप्पू साहू नावाच्या एका व्यक्तीच्या नोकराला पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. त्याने पप्पू साहू याच्या गाडीमधून रक्ताचे डाग धुऊन काढल्याची माहिती चौकशीत दिलेली असून अद्यापपर्यंत मुख्य आरोपी पप्पू साहू फरार आहे.

उपलब्ध माहितीनुसार , सना खान यांचा विवाह पप्पू साहू यांच्यासोबत झालेला होता. लग्नानंतर त्यांच्यात वाद सुरू झाले त्यानंतर पश्चिम नागपूरच्या महिला भाजपच्या नेत्या सना खान एक ऑगस्टपासून नागपूर येथून बेपत्ता झालेल्या होत्या. जबलपूरला गेल्यानंतर त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने सना खान यांच्या आईने मानकापूर पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केलेली होती.

पोलीस तपास सुरू असतानाच जबलपूर येथील एका व्यक्तीने सना खान यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानंतर मानकापूर पोलिसांचे एक पथक जबलपूर येथे रवाना झालेले होते. जबलपूर इथे महिलेचा मृतदेह आढळून आला आणि त्यानंतर हा मृतदेह अखेर सना खान यांचा असल्याचीच माहिती समोर आलेली आहे . एक ऑगस्टपासून त्या बेपत्ता झालेल्या होत्या. पोलीस सध्या पप्पू साहू याचा शोध घेत आहेत.


Spread the love