
पुण्यात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून स्वतः विवाहित असताना विवाहबाह्य संबंध ठेवून त्याबाबत विचारणा करणाऱ्या पत्नीला चक्क पट्ट्याने मारहाण करून शारीरिक आणि मानसिक छळ करणाऱ्या पोलीस शिपायाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. संदीप हिरामण खंडागळे ( वय 30 राहणार देवी नगर येरवडा ) असे पोलीस शिपायाचे नाव असून तो सध्या येरवडा वाहतूक विभागात कार्यरत आहे. त्याच्या पत्नीने येरवडा पोलिसात फिर्याद दिली असून आरोपी जून 2019 पासून आपला छळ करत होता असे देखील त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
संदीप खंडागळे यांचे कारागृहात पोलीस शिपाई असलेल्या तक्रारदार यांच्यासोबत लग्न झालेले असून संदीप याने लग्नात आलेले स्त्रीधन आपल्या संमतीशिवाय परस्पर बँकेत गहाण ठेवले त्यानंतर त्याचे पालघर येथील महिला पोलीस शिपाईसोबत विवाहबाह्य संबंध सुरू झाले यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी शिवीगाळ केली तसेच बेल्टने मारहाण केली. फिर्यादी त्यावेळी गरोदर होत्या मात्र त्याचा देखील त्याने विचार केला नाही. फिर्यादी यांचा पगार स्वतःच्या खात्यावर जमा करून त्याने त्यांना मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या त्रास दिला असे देखील त्यांनी म्हटलेले असून पोलीस सदर प्रकरणाचा तपास करत आहेत.