अजबच..बहिणीसोबत सासरी पाठवलेली तरुणी पळाली कुणाबरोबर तर ..

Spread the love

देशात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असताना अशीच एक घटना राजस्थान इथे उघडकीस आली आहे .आपल्या बहिणीच्या सासरच्या घरी आलेल्या एका तरुणीचे तिच्या बहिणीची नणंद असलेल्या तरुणीसोबत प्रेमसंबंध सुरु आले आणि त्यांनी प्रेमाच्या सगळ्या मर्यादा पार केल्या.

अवघ्या काही दिवसात त्यांच्यात प्रेम इतके बहरून आले की त्यांनी घरातून पलायन केले आणि दोघीनी हरियाणा इथे जाऊन विवाह देखील केला दुसरीकडे कुटुंबीय मात्र त्या तरुणीसाठी चांगला मुलगा शोधत होते मात्र ती चक्क दुसऱ्या मुलीसोबतच पळून गेली आहे . राजस्थानच्या चुरू येथील ही घटना असून त्यांच्या या लग्नाची आता चांगली चर्चा होत आहे.

रतनगड येथील रहिवासी मुलीचे वडील म्हणतात की , ‘ मी माझ्या मुलीला मी खूप समजावले मात्र तरीही ती ऐकत नाही .माझी मुलगी तशी अजिबात नव्हती. कुठल्या ना कुठल्या दबावात किंवा काहीतरी जादूटोणा झाल्याने ती तिच्यासोबत गेली असावी. तीन भावंडांमध्ये ती सर्वात लहान आहे. भाऊ मजुरीचे काम करतो तर दुसरा अपंग आहे. मुलगी सातवीपर्यंत शिकली आहे पण आता मी तिला कसं समजावू ? ती काही समजून घ्यायला तयार नाही. ‘

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ दोन्ही मुली एकमेकींवर खूपच जास्त प्रेम करतात आणि त्यांना एकत्र राहायचे आहे. दोघींना आम्ही खूप समजावले पण पटले नाही. एएसआयने सांगितले की, मुलींकडे हरियाणात लिव्ह-इन रिलेशनशिपची कागदपत्रे मिळाली आहेत मात्र त्यांच्याकडे लग्नाशी संबंधित कोणतीही कागदपत्रे अद्याप तरी मिळाली नाहीत.

रतनगडमधील 18 वर्षीय तरुणीने सांगितले की, ‘ तिला तिचे आयुष्य मुक्तपणे जगायचे आहे ‘ याशिवाय हरियाणातील 22 वर्षीय तरुणीने सांगितले की ‘ आम्ही दोघी एकमेकींवर प्रेम करतोय आणि भविष्यात आम्हाला एकत्र आयुष्य घालवायचे आहे. ‘ दोघांच्याही कुटुंबीयांनी आणि पोलिसांनी त्यांना बराच वेळ समजावून सांगितल्यानंतरही त्यांच्या निर्णयात काही फरक पडलेला नाही .


Spread the love