अनैतिक संबंधांतून जन्मली ? पुण्यात घडली धक्कादायक घटना

Spread the love

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असून अशीच एक घटना पुणे इथे उघडकीला आली आहे. अनैतिक संबंधातून जन्म झाल्याच्या संशयावरून तीन वर्षीय चिमुकलीचा सावत्र पित्याने खाली डोके वर पाय करून तिचे डोके भिंतीवर आपटून खून केला आहे. आंबेगाव बुद्रुक येथील श्रीकृष्ण अपार्टमेंट येथे हा प्रकार घडलेला असून जितेंद्र उत्तम पाटील (33, आंबेगाव बुद्रुक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

उपलब्ध माहितीनुसार, मुस्कान (वय 03) असे हत्या झालेल्या चिमुरडीचे नाव असून एका 24 वर्षीय महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पत्नीच्या अनैतिक संबंधातून ही मुलगी जन्मलेली असल्याचे त्याचे म्हणणे होते आणि या रागातून त्याने मुलीची हत्या केली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

जितेंद्र हा चालक म्हणून काम करत असून तो मूळचा जळगाव जिल्ह्यातील आहे. तर पत्नी गृहिणी असून ती गोदिंया जिल्ह्यातील आहे. त्यांचा जानेवारी 2022 मध्ये विवाह झाला होता. जितेंद्र याची पत्नी हिचा पहिला विवाह झालेला असून तिची मुस्कान ही मुलगी असल्याचे तिने जितेंद्रला सांगितले होते मात्र पहिल्या पतीबरोबर घटस्फोट झाल्याची माहिती तिने जितेंद्र याला दिली होती मात्र सगळे मान्य करत जितेंद्र याने विवाह केला होता .

आंबेगाव बुद्रुक परिसरातील दुग्गड शाळेच्या पाठिमागे एका सोसायटीत भाड्याच्या खोलीत राहत असताना जितेंद्र याला आपल्या पत्नीचा पहिला विवाह झालेलाच नाही आणि ‘ मुस्कान’ ही अनैतिक संबंधांतून जन्मलेली आहे असे वाटू लागले आणि त्यातून गुरुवारी त्यांच्यात वाद झाले. त्याने मुस्कान हिचे पाय धरून तिला उलटे करत तिचे डोके भिंतीवर आपटले आणि ती बेशुद्ध झाली.

तिला दोघांनी तात्काळ ससून रुग्णालयात दाखल केले मात्र याच दरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर रुग्णालयाने भारती विद्यापीठ पोलिसांना याबाबत माहिती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर व पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगिता यादव यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू करून गुन्हा दाखल करत जितेंद्र याला अटक केली.


Spread the love