अन अखेर ‘ त्या ‘ महिलेची ओळख पटली , घरातून निघून गेली अन ..

Spread the love

महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यानजीक एक धक्कादायक घटना शुक्रवारी अकरा तारखेला उघडकीला आली होती. भाटघर धरणाच्या भिंतीलगत एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर बराच काळ या महिलेची ओळख पटत नव्हती मात्र अखेर तिची ओळख पटवण्यात शिरवळ पोलिसांना यश आले असून पतीसोबत झालेल्या वादातून या महिलेने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

उपलब्ध माहितीनुसार मंजुश्री शरद कोईनकर ( वय 28 राहणार बिल्डार तालुका भद्रावती जिल्हा चंद्रपूर )असे मयत महिलेचे नाव आहे. भाटघर धरणाच्या भिंतीलगत एका छोट्या पुलाजवळ अकरा तारखेला संध्याकाळी या महिलेचा मृतदेह आढळला होता. सदर घटनेची नोंद शिरवळ पोलीस ठाण्यात झाली होती त्यानुसार महिलेची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले होते मात्र अखेर तिचे नाव ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले असून पतीसोबत झालेल्या वादातून सदर महिला ही घरातून निघून गेली होती आणि त्यानंतर तिने आत्महत्या केली असे समोर आले आहे .


Spread the love