..अन कोयता गँगचा ‘ दुसरा ‘ पोलिसांनी धरला , अशी झाली कारवाई

Spread the love

तीन-चार दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी कोयता गॅंगच्या एका सदस्याला चांगलाच चोप देत जेरबंद केले होते. तो व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला मात्र यातील आरोपींची संख्या ही दोन होती आणि त्यातील एक जण फरार झालेला होता. हातात कोयता घेऊन दिसेल त्या वस्तूंची तोडफोड करत दोन्ही आरोपी हे मोकाट झालेले व्हिडिओमध्ये दिसून येत होते. नागरिकांमध्ये त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि पोलिसांनी एका झटक्यात एका भाईची जोरदार पिटाई केली होती तर एक भाई गायब झालेला होता. त्याच्या देखील मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

28 डिसेंबर रोजी हा प्रकार घडलेला होता त्यातील एक आरोपी हा अल्पवयीन होता तर दुसरा सज्ञान होता. अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी पकडले मात्र करण अर्जुन दळवी हा वीस वर्षाचा तरुण मात्र घटनेनंतर फरार झालेला होता. गुंडांनी माजवलेल्या दहशतीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी एका आरोपीला पकडल्यानंतर त्यांचे कौतुक सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात झालेले होते मात्र एक आरोपी अद्यापही फरार असल्याने पोलिस त्याचा शोध घेत होते.

गुप्त सूत्रांच्या माध्यमातून पोलिसांना हा आरोपी बीड येथे असल्याची माहिती समजली आणि भारती विद्यापीठ पोलिसांचे एक पथक बीड येथे दाखल झाले आणि या आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या. पोलिसांनी त्याला ज्या ठिकाणी तो दहशत माजवत होता तिथेच घेऊन आले आणि त्या वेळी त्याचे दोन्ही हात दोरखंडाने पाठीमागे बांधलेले होते आणि त्याच परिसरात त्याची धिंड काढण्यात आली. जिथे आपण मस्ती दाखवली तिथेच दोरखंडांनी बांधलेले हात आणि परिसरातील नागरिकांच्या नजरा याने आरोपी शर्मसार झाला होता.


Spread the love