अपघात नव्हे तर तो खून , दारू पिण्यास बसले अन त्यानंतर..

Spread the love

किरकोळ कारणावरून गुन्हेगारीचे प्रमाण महाराष्ट्रात वाढलेले पाहायला मिळत असून अशीच आणखीन एक घटना नाशिकच्या सातपूर परिसरातील शिवाजीनगर इथे समोर आलेले आहे . एका मंदिराच्या परिसरात तीन मित्र दारू पिण्यासाठी बसलेले होते त्यानंतर वाद झाल्यानंतर दारूच्या नशेत एका मित्राने दुसऱ्यावर गुप्तीने वार करत त्याचा खून केला आणि अपघाताचा बनाव रचलेला होता मात्र पोलिसांनी अखेर आरोपीला अटक केलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , विश्वनाथ उर्फ बबलू भीमराव पाटील ( वय 37 ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून शनिवारी 26 तारखेला रात्री ही घटना घडलेली आहे . कार्बन नाका परिसरात समशेर शेख , दीपक सोनवणे आणि विश्वनाथ पाटील हे तिघेजण दारू पिण्यासाठी बसलेले होते त्यावेळी त्यांच्यात वाद झाला आणि वाद विकोपाला गेल्यानंतर समशेर शेख याने विश्वनाथ याच्यावर हल्ला केला त्यानंतर त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.

आपल्या हातून खून झाल्यानंतर समशेर आणि दीपक या दोन आरोपींनी त्याचा अपघात झाल्याचा बनाव रचला आणि शासकीय रुग्णालयात त्याला दाखल केले मात्र कर्मचाऱ्यांना याप्रकरणी शंका आली आणि त्यानंतर हे बिंग फुटले . गंगापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


Spread the love