अभिनेत्रीसोबत ‘ अनैसर्गिक ‘ शारीरिक संबंध , पोलिसांकडून न्यायालयात क्लोजर रिपोर्ट

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना मुंबईत समोर आलेली असून सातत्याने लग्नाचे आमिष दाखवत एका अभिनेत्रीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या आरोपीच्या बद्दलचा न्यायालयात पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट सादर केलेला आहे. पोलिसांच्या रिपोर्टनुसार आरोपी हा कतार एअरवेजचा माजी कर्मचारी त्याच्या विरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे असे म्हटलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार , मार्च 2021 मध्ये जुहू पोलिसांनी कतर एअरवेजच्या एक माजी कर्मचाऱ्याच्या विरोधात एका अभिनेत्रीने दिलेल्या तक्रारीवरून बलात्कार अनैसर्गिक लैंगिक संबंध आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला होता. महिलेच्या म्हणण्याप्रमाणे आरोपीने मार्च 2020 पासून फेब्रुवारी 2021 पर्यंत अमेरिका आणि मुंबईतील अनेक हॉटेलमध्ये तिच्यावर बलात्कार केलेला आहे असे म्हटलेले होते.

महिलेच्या म्हणण्यानुसार आरोपीने आपली पत्नी आणि मुलगा जिवंत असताना देखील ते मयत झालेले आहेत असे सांगितले आणि आपली फसवणूक केली. आरोपीच्या वकिलांच्या वतीने महिलेने आपल्या अशिलाविरुद्ध दाखल केलेल्या फसवणुकीच्या खटल्याचा एक बदला म्हणून ही खोटी तक्रार दाखल करण्यात आलेली होती असे म्हटलेले आहे . महिलेने हेतू पुरस्पर त्यांच्या विरोधात खोटा गुन्हा दाखल केला असे पोलिसांनी बी समरी रिपोर्टमध्ये म्हटलेले आहे.


Spread the love