अवघ्या दोन महिन्यावर लग्न आले होते मात्र होणारा पती अचानक म्हणाला की ?

Spread the love

महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना समोर आलेली असून लग्न होण्याच्या आधी सासरच्या मंडळींकडून हुंड्याचे दागिने आणि पैशांसाठी होत असलेला छळ तसेच होणाऱ्या पतीने लग्नाआधीच तू जाड आहे असे म्हणून हिणवले आणि लग्न मोडण्याची धमकी दिली त्यामुळे तरुणीने निराश होत आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, रामेश्वरी रवींद्र नागपुरे ( वय 24 राहणार कुऱ्हे तालुका भुसावळ जिल्हा जळगाव ) असे मयत तरुणीचे नाव असून तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सदर प्रकरणी संबंधीत तरुण आणि त्याची आई यांच्या विरोधात जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेहाचा ताबा घेणार नाही असा पवित्रा तरुणीच्या नातेवाईकांनी घेतला होता त्यामुळे शनिवारी दुपारपर्यंत मृतदेह हा रुग्णालयातच होता.

रामेश्वरी हिचे भूषण ज्ञानेश्वर पाटील ( राहणार रावेर हल्ली मुक्काम सातपूर नाशिक ) याच्याशी लग्न ठरले होते. सहा मार्च रोजी त्यांचा साखरपुडा देखील झाला होता तर 18 मे रोजी विवाहाचा मुहूर्त काढण्यात आलेला होता. काही दिवसांनी भूषण यांच्या आई आणि आणि त्याच्या आई कडून दागिने आणि पैशांसाठी तगादा सुरू झाला त्यानुसार त्यांनी काही दागिने आणि रोख रक्कम देखील दिली मात्र त्यातून सासरच्या मंडळींचे समाधान झाले नाही.

अवघ्या काही दिवसात भूषण यांच्याकडून पिडीत तरुणीला ‘ तू जाड आहेस मला तू आवडत नाही. मामांनी सांगितले म्हणून मी होकार दिला पण आता मी हे लग्न मोडणार आहे तसेच आपले लग्न झालेच तर हे लग्न कुऱ्हे गावात नाही तर भुसावळ मधील लॉनवर करायचे ‘ असे देखील सांगून तिला एक पद्धतीने लग्नासाठी ब्लॅकमेल देखील करत होता. त्याच्या सातत्याने असल्या वागण्याला कंटाळून पीडित तरुणीने आत्महत्या केली असे तरुणीच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.

आपला होणारा पती सातत्याने जाड म्हणून हिणवत असल्याने रामेश्वरी यांनी हिने भुसावळ येथे जिम देखील लावली होती. जिम मधील आपले फोटो तिने होणारा पती भूषण याला पाठवले होते मात्र तरी देखील ‘ आता जिम लावुन काय उपयोग ‘ असे म्हणत तिचे मानसिक खच्चीकरण करत होता. प्रत्येक वेळी भूषण आणि त्याची आई यांच्या माहेरच्या मंडळींकडून अपेक्षा वाढतच होत्या असे देखील रामेश्वरी हिचे चुलत भाऊ जीवन विश्वनाथ नागपुरे यांनी सांगितले आहे.


Spread the love