‘ अशी कोण आत्महत्या करेल का ? ‘, पोलिसांना भेटला ‘ तो ‘ क्लू अन आरोपी धरला

Spread the love

महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून किरकोळ कारणावरून नागरिक कायदा हातात घेत असल्याचे चित्र निर्माण होऊ पाहत आहे. अशातच मुंबई येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून मामे भावाचे शंभर रुपये न देता त्याला शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून मित्रानेच गॅरेजमधील दोरीने त्याच्या मित्राचा गळा आवळून खून केल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर त्याचा मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून पेटवून देत त्याने आत्महत्या केली असा देखील बनाव त्याने रचला होता मात्र त्याचा हा बनाव फार काळ टिकला नाही. दहिसर पोलिसांनी या प्रकरणी परमेश्वर कोकाटे याला अटक केली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, राजू पाटील असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून पाटील आणि कोकाटे यांच्यामध्ये गेल्या आठ वर्षांपासून मैत्री होती मात्र दरम्यानच्या काळात कोकाटेच्या मामेभावा कडून घेतलेले 100 रुपये मामेभावाला पाटील याने परत केले नाहीत आणि त्याला शिवीगाळ केली यावरून त्या दोघांमध्ये देखील वाद निर्माण होत होते. दोघेही दहिसर येथील एका गॅरेजमध्ये राहत होते.

4 फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास दारू पिल्यानंतर याच 100 रुपयावरुन त्यांच्यात वाद झाला आणि कोकाटेने रागात त्याला खाली पाडले आणि गॅरेजमधील दोरीने त्याचा गळा आवळला त्यातच पाटील याचा मृत्यू झाला. त्यानंतर काही कपडे आणि ब्लॅंकेटमध्ये त्याला गुंडाळून कोकाटे याने त्याला पेटवून दिले आणि थोड्या वेळाने आग लागली आग लागली असे सांगत तो बाहेर आला. स्थानिकांच्या मदतीने आग विझवण्यात आली मात्र पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शोध सुरू केला.

पोलीस तपासादरम्यान ब्लॅंकेटमध्ये स्वतःला गुंडाळून कोणी आत्महत्या कसे करू शकतो ? यामुळे कोकाटे यांच्याकडे पोलिसांच्या संशयाची सुई वळली आणि पोलिसांनी कोकाटे यांच्याकडे उलट तपासणी सुरू केली सुरुवातीला नाही म्हणणाऱ्या कोकाटे याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली आहे. त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे .


Spread the love