‘ अशी ‘ होते पीक विम्याची रक्कम कमी , प्राजक्त तनपुरे विमा कंपनीच्या विरोधात आक्रमक

Spread the love

सध्या शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून अत्यल्प विमा मिळत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहे. प्रत्यक्ष पंचनामा आणि नुकसान भरपाई रक्कम देताना कंपनीचे वरिष्ठ अधिकारी सॉफ्टवेअरमध्ये घोटाळा करून शेतकऱ्यांना मदत जुजबी करत आहे असा प्रकार समोर येत असून आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पोलिस ठाणे गाठत संबंधित विमा कंपन्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

आमदार प्राजक्त तनपुरे यांनी मागील आठवड्यात विमा कंपन्यांचे प्रतिनिधी, शेतकरी आणि कृषी विभागाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली होती त्यावेळी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी योग्य तो मोबदला देऊ असे देखील सांगितले होते मात्र प्रत्यक्षात कंपनीकडून त्याची अंमलबजावणी करताना शेतकऱ्यांच्या हातात अत्यल्प रक्कम येत होती. शेतकऱ्यांनी पुन्हा प्राजक्त तनपुरे यांच्याकडे धाव घेतली त्यानंतर पुन्हा बैठक घेण्यात आली आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांना प्राजक्त तनपुरे यांनी चांगलेच धारेवर धरले.

अनेक शेतकऱ्यांनी प्राजक्त तनपुरे यांच्याकडे कंपनीचे वरिष्ठ अधिकारी सॉफ्टवेअर मध्ये फेरफार करून शेतकर्‍यांच्या हातात अत्यल्प मोबदला टेकवत आहे असा आरोप केला होता त्यानंतर प्राजक्त तनपुरे यांनी पोलिस ठाणे गाठले. शेतकऱ्यांकडून विमा कंपन्या कोट्यावधी रुपयांचा विमा जप्त घेतात मात्र तुटपुंजी मदत करून शेतकऱ्यांची फसवणूक करतात असा आरोप केलेला आहे तसेच विमा कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.


Spread the love