आंबे विकत घ्यायला घरी बोलावले अन त्यानंतर ‘ वेळोवेळी ‘ लॉजवर , पुण्यातील प्रकार

Spread the love

गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत आहे अशीच एक घटना पुणे शहरात उघडकीला आली असून आंबे विकत घेण्याच्या बहाण्याने घरी बोलावून लग्नाचे आमिष दाखवत तरुणीला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडण्यात आले आणि आणि त्याचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सदर प्रकरणी 28 वर्षाच्या एका तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अनिकेत ईश्वर भटेवरा ( वय 26 राहणार कल्याणीनगर ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पीडित तरुणीच्या म्हणण्यानुसार हा प्रकार आरोपीच्या घरी तसेच परिसरातील अनेक लॉजवर वेगवेगळ्या रूममध्ये ९ एप्रिल २०२१ ते नऊ एप्रिल २०२२ दरम्यान घडलेला आहे.

आरोपी आणि फिर्यादी हे परस्परांच्या ओळखीचे असून अनिकेत भटेवरा याने या तरुणीला आंबे विकत देण्याच्या बहाण्याने घरी बोलावले आणि घरात कोणी नसताना मी तुझ्याशी लग्न करणार आहे असे म्हणून लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. सदर प्रकाराचा त्याने व्हिडिओ देखील बनवला आणि हे फोटो आणि व्हिडिओ याचा वापर करत त्याने तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केले असे फिर्यादी यांचे म्हणणे आहे .


Spread the love