आई सांगून थकली पण पोरी पळून जायच्या थांबेनात , कोलकात्तावरून वडील आले अन..

Spread the love

देशात एक खळबळजनक असे प्रकरण सध्या बिहारच्या वैशाली जिल्ह्यात समोर आलेले असून केके सराय पोलीस स्टेशन परिसरात दोन बहिणींच्या हत्येनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मनी भाकूरहर गावात आई-वडिलांनी आपल्या पोटच्या दोन्ही मुलींचा जीव घेतलेला असून घटना त्यानंतर वडील फरार झाले आहेत तर आईला पोलिसांनी अटक केलेली आहे. पोलीस चौकशीत आईने हत्येची कबुली दिलेली असून जे काही कारण सांगितले ते ऐकून पोलीस देखील चकित झाले आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, आरोपी असलेला बाप नरेश भगत हा कोलकत्ता येथे नोकरीनिमित्त राहत असून त्याची बायको रिंकू देवी ही दोन मुलींसोबत वैशाली जिल्ह्यातील मनी भाकूरहर गावात राहते. दोन्ही मुली अनेकदा घरातून पळून गेलेल्या होत्या. काही दिवस बाहेर राहिल्यानंतर त्या पुन्हा घरी यायच्या त्यामुळे कुटुंबाची देखील मोठ्या प्रमाणात बदनामी होत होती त्यानंतर या प्रकरणाची रिंकू देवी हिने तिच्या पतीला कल्पना दिली आणि नरेश भगत हा आपल्या गावी आलेला होता.

घटना घडली त्या दिवशी दोन्ही मुली आणि आई-वडिलात जोरदार भांडण झाले आणि त्यानंतर संतप्त झालेल्या आई-वडिलांनी त्यांची हत्या केली. आपल्या हातून हत्या घडल्याचे समजतात दोघेही घाबरून गेले. पोलिसांपर्यंत प्रकरण गेले आणि पोलीस घरी पोहोचले त्यावेळी पोलिसांना पाहून नरेश हा पळून गेला तर पोलिसांनी रिंकू देवी हिला ताब्यात घेतलेले आहे. मोठ्या बहिणीचे वय 18 वर्षे असून लहान बहिणीचे वय सोळा वर्षे असल्याचे समजते.


Spread the love