‘ आता तरी कामावर ये ‘ , तब्बल सात वर्षे गायब होता पीसीएमसीचा कर्मचारी अन अखेर..

Spread the love

पिंपरी चिंचवड महापालिकेत एक अजब प्रकार समोर आलेला असून महापालिकेच्या एका क्षेत्रीय कार्यालयात शिपाई म्हणून काम करणारा एक कर्मचारी तब्बल सात वर्षे कामावर आलेला नाही अखेर त्याला महापालिकेने नोटीस पाठवली मात्र नोटीसला देखील त्याने केराची टोपली दाखवली त्यामुळे अखेर प्रशासनाने त्याला कामावरून काढून टाकलेले आहे.

सुनील पाटील असे या कर्मचाऱ्यांचे नाव असून मे 2016 मध्ये तो कामावर आलेला होता त्यानंतर त्याने महापालिकेकडे पाठ फिरवली. प्रशासनाला त्याने त्याबाबत काही कळवले देखील नाही मात्र तरी देखील त्याला पाठीशी घालत महापालिका प्रशासनाचा कारभार सुरू होता . त्याची वेतन वाढ रोखण्याचा देखील प्रयत्न करून पाहिला . त्याला नोटीसही देण्यात आली त्यानंतर वर्तमानपत्रात देखील नोटीस देण्यात आली मात्र त्याच्यावर काहीही परिणाम झाला नाही आणि अखेर त्याला राहत्या घरी नोटीस पाठवली मात्र तिथे देखील तो आढळून आला नाही.

महापालिकेने त्याच्याशी केलेला संपूर्ण पत्र व्यवहार देखील परत आला त्यानंतर त्याच्या नातेवाईकांना फोन करून ‘ आता तरी कामावर ये ‘ यासंदर्भात पाठपुरावा देखील करण्यात आला मात्र तरी देखील काहीही यश मिळाल्याने अखेर कामावरून तुम्हाला काढण्यात येऊ नये यासंदर्भात नोटीस देण्यात आली आणि अखेर त्याच्या हातात नारळ सोपवण्यात आला. तब्बल सात वर्षांनंतर महापालिकेला जाग आल्यामुळे महापालिकेच्या या कारभारावर देखील टीका करण्यात येत आहे.


Spread the love