‘ आता समजलं बाबा महिलांच्या कपड्यात का पळाले ‘

Spread the love

रामदेव बाबा यांनी ठाणे येथील योग शिबिरात बोलताना महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते त्यांच्या या वक्तव्यावर चौफेर टीका होत असताना तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या महुवा मोईत्रा यांनी जोरदार हल्लाबोल केला असून त्या म्हणाल्या आहेत की, ‘ आता मला समजले की बाबा रामदेव महिलांच्या कपड्यात रामलीला मैदानातून का पळून गेले होते. त्यांच्या मेंदूमध्ये आजार आहे त्यामुळे त्यांचे विचार एकतर्फी आहेत असेही त्या म्हणाल्या.

रामदेव बाबा यांनी, ‘ तुम्ही साडी छान दिसता सलवार सूट मध्ये देखील छान दिसता आणि माझ्यासारखे काही घातले नाही तरीही छान दिसता. आता लोक सार्वजनिक ठिकाणी लाजेसाठी कपडे घालतात.. आठ दहा वर्ष आम्ही असेच कपडे विना फिरायचो ‘, असे म्हटले होते. धक्कादायक बाब म्हणजे यावेळी अनेक महिला तिथे उपस्थित होत्या. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी देखील या वक्तव्याचा निषेध केलेला असून रामदेव बाबा यांनी तात्काळ माफी मागावी असे म्हटलेले आहे.


Spread the love