
महाराष्ट्रात एक वेगळीच घटना हिंगोली येथे समोर आलेली असून येथील शासकीय विश्रामगृहात दोन दिवसांपासून मुक्काम करत राहिलेल्या एका जोडप्याची सोमवारी पोलिसांनी चौकशी केली आहे तसेच त्यांचा जबाब देखील नोंदवून घेतलेला आहे. सदर व्यक्ती हा गुत्तेदार असून तो अमरावती येथील असल्याची माहिती पुढे आली आहे तर त्याच्यासोबत असलेल्या महिलेची देखील चौकशी सुरू असल्याचे समजते .
हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात आमदार एक आमदार कार्यकर्त्यांसह बैठकीसाठी आले होते त्यावेळी विश्राम ग्रहाचा एक कक्ष बंद आढळून आला त्यावेळी एका कार्यकर्त्याने दरवाजा वाजवला असता आतून एक स्त्री आणि पुरुष बाहेर आले आणि त्यांच्या कक्षात वेगळेच काहीतरी चालू असल्याची शक्यता पोलिसांना देण्यात आली. पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांना चौकशीसाठी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात नेण्यात आले.
तपासादरम्यान दोघे गेल्या दोन दिवसांपासून विश्रामगृहात राहत असल्याची माहिती समोर आलेली आहे आणि बांधकाम विभागातील एका मोठ्या अधिकाऱ्याने त्यांना हा कक्ष मिळवून दिला अशी देखील चर्चा आहे. सदर प्रकरणी पोलिसांनी जबाब नोंदवला असून पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे यांनी ही माहिती दिलेली आहे. शासकीय विश्राम गृहाचा अशा पद्धतीने होणारा दुरुपयोग ही चिंतेची बाब असून सदर प्रकरणी आता काय कारवाई केली जाते याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिलेले आहे.