आश्रमात अत्याचार प्रकरणाची व्याप्ती वाढली , संशयित हर्षल मोरेला बेड्या

Spread the love

नाशिक जिल्ह्यातील म्हसरूळ येथे एक खळबळजनक अशी घटना काही दिवसांपूर्वी उघडकीला आली होती. म्हसरूळ येथील एका रो हाऊसिंग मध्ये भाडे तत्वावर चालवल्या जाणाऱ्या आश्रम शाळेतील तब्बल 13 अल्पवयीन मुली आंघोळ करत असताना त्यांचे मोबाईलद्वारे शूटिंग करून त्यांना ब्लॅकमेल करणारा संचालक संशयित हर्षल बाळकृष्ण मोरे याच्या वासनेच्या तब्बल 13 मुली शिकार झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

आधार आश्रमातील पीडित अल्पवयीन मुलींना हर्षल हा सत्संगाच्या नावाखाली सटाणा, विरगाव आदी परिसरात घेऊन जायचा त्या वेळी त्याने मुलींच्या अंघोळीचे फोटो आणि व्हिडिओ काढून त्यांना धमकावले असे देखील पीडित मुलींनी पोलिसांना सांगितले असून सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे. द किंग फाउंडेशन संस्थेकडून संचलित केल्या गेलेल्या ज्ञानदीप गुरुकुल आश्रम हा म्हसरूळ येथील शिवारात चालवला जात होता.

आदिवासी तालुक्यातील गोरगरीब कुटुंबातील दहा ते सोळा वर्षे वयोगटातील मुलींना या आश्रमात प्रवेश देण्यात आलेला होता. समाजसेवेच्या नावाखाली हर्षल मोरे याने माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य केले असून त्याचा सर्वच थरातून संताप व्यक्त केला जात आहे. एका पीडित मुलीने त्याच्या विरोधात फिर्याद दिली आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

पीडित मुलीने म्हटल्याप्रमाणे, आपल्याला पाय चेपण्याच्या बहाण्याने त्याने बोलावून घेतले आणि त्यानंतर आपल्याला अश्लील व्हिडिओ दाखवून त्याने तिच्या सोबत शारीरिक सुखाची मागणी केली. पीडित मुलीने नकार दिला असता त्याने तिला आश्रमातून काढून टाकण्याची देखील धमकी दिली असे देखील मुलीने म्हटलेले आहे. पोलिसांनी कारवाई करत आश्रमातील इतर मुलींचे जबाब नोंदवले असून पाच मुलींनी आतापर्यंत त्याने आपल्यावर अत्याचार केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.


Spread the love