‘ उसने पैसे देतो का नाही बोल ? ‘ , सेवा सोसायटीच्या चेअरमनला धरलं अन..

Spread the love

नगर जिल्ह्यात शेवगाव येथे एक खळबळजनक घटना समोर आलेली असून उसने पैसे दिले नाही म्हणून सेवा सोसायटीच्या चेअरमनला चाकू आणि काठीच्या साहाय्याने मारहाण करण्यात आलेली आहे. सदर प्रकरणी चार जणांच्या विरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, शेवगाव तालुक्यातील सोनेसांगवी येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन सुभाष जनार्दन आंधळे यांना हे गावातील एका दुकानात इस्त्रीसाठी गेलेले असताना दुकानाबाहेर उभे राहिलेले होते त्यावेळी संतोष श्रीकिसन कातकडे, ज्ञानदेव विठ्ठल कातकडे, भारत ज्ञानदेव कातकडे, किशोर आबासाहेब कातकडे ( सर्वजण राहणार राक्षी ) हे तिथे आले आणि आंधळे यांना उसने पैसे मागू लागले .

सुभाष आंधळे यांनी आता आपल्याकडे पैसे नाही आल्यानंतर तुम्हाला देईल असे सांगितले मात्र संतोष कातकडे याने हातात असलेल्या धारदार चाकूने त्यांच्या पाठीच्या डाव्या बाजूला वार करून त्यांना जखमी केले तसेच इतरांनी काठीने मारहाण करत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात दाखल होत गुन्हा नोंदवलेला आहे.


Spread the love