
ब्रिटनच्या पंतप्रधानपदी ऋषी सूनक यांची निवड झाल्यानंतर भारतातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात आनंद उत्सव साजरा करण्यात आला. दिवाळीच्या दिवशीच ऋषी सूनक यांची निवड झाल्याने अनेक भारतीय नागरिकांनी मोठ्या प्रमाणात त्यांचे अभिनंदन देखील केले आणि सोशल मीडियावर देखील त्यांची जोरदार चर्चा सुरू झाली. ब्रिटन या देशाला आर्थिक संकटातून सावरण्यासाठी आम्ही आम्ही प्रयत्नशील राहू असे सांगत ऋषी सूनक यांनी भारतीय वंशाच्या खासदाराकडून कॅबिनेट मंत्रिपद काढून घेतलेले आहे.
पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर ऋषी यांनी धडाडीचे निर्णय घेण्यास सुरुवात केली असून भारतीय वंशाच्या असलेल्या आलोक शर्मा यांना यांच्या मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आलेला आहे तर जेरेमि हंटर यांना अर्थमंत्रीपदि कायम ठेवण्यात आलेले आहे . सध्या ब्रिटन आर्थिक संकटातून जात असून या संकटातून बाहेर काढण्याची मोठी जबाबदारी ऋषी सूनक यांच्यावर आहे त्यातून त्यांनी हा निर्णय घेतला असल्याची चर्चा असून भारतीय वंशाच्या व्यक्तीला कॅबिनेट मंत्रिमंडळातून काढून टाकल्याबद्दल ऋषी सुनक यांच्या विरोधात काहीसे नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे.