एका सारस पक्षाने संपूर्ण राज्यात राजकारण तापले , काय आहे प्रकरण ?

Spread the love

सोशल मीडियावर सध्या उत्तर प्रदेश येथील एका सारस पक्षाची जोरदार चर्चा सुरू असून या पक्षावरून राज्यातील राजकारण देखील तापलेले पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशातल्या अमेठी येथे एका सारस पक्षाचा जीव वाचवल्यानंतर आरिफ नावाच्या व्यक्तीची आणि या पक्षाची दोस्ती झाली मात्र या दोस्तीला राजकारणाचे ग्रहण लागलेले आहे.

सारस पक्षाचा जीव वाचवणारा आरिफ हा गेल्या वर्षभरापासून त्याच्यासोबत राहत असून वन विभागाने मंगळवारी त्याच्या ताब्यातून सारस पक्षाला उचलून नेले आणि नैसर्गिक अधिवासात नेऊन सोडले. समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी आरिफ याची भेट घेतलेली होती त्यानंतर अवघ्या काही तासांच्या आत वनविभागाकडून ही कारवाई करण्यात आली आणि यात राजकारणाची इंट्री झाली.

अखिलेश यादव यांनी याप्रकरणी बोलताना, ‘ मुख्यमंत्र्यांना हवे तर सारसचे नामकरण करावे पण त्याला शोधून त्याचा जीव वाचवावा. मुख्यमंत्र्यांच्या गोलूप्रमाणे ( योगी आदित्यनाथ यांचा कुत्रा ) तो सारस देखील राज्याला तितकाच प्रिय आहे ‘, असा टोमणा मारलेला आहे आणि त्यानंतर सारस एका गावात सापडल्याचा व्हिडिओ शेअर करत ‘ प्रेमापेक्षा मोठी कोणतीही सत्ता नाही हे सत्य आहे हे भाजपवाल्यांना वेळेत समजले तर कदाचित त्यांच्यातील द्वेष थोडा कमी होईल ‘ असे म्हटलेले आहे. सध्याच्या परिस्थितीत हा सारस पक्षी आरिफ यांच्या ताब्यात नसून लवकरात लवकर पुन्हा त्याला त्यांच्या ताब्यात देण्यात यावे अशी मागणी सोशल मीडियावर जोर धरते आहे.


Spread the love