
औरंगाबाद शहरातील बेगमपुरा आणि क्रांती चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत गैरवर्तन करणाऱ्या आणि सामाजिक शांतता भंग करणाऱ्या मनोरुग्ण वर प्राथमिक उपचार करण्यासाठी बेगमपुरा पोलिसांनी न्यायालयाच्या परवानगीनंतर सदर तरुणाची येरवडा येथील मेंटल हॉस्पिटलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.
बेगमपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत महापुरुषांच्या पुतळ्यांना परिसरात दगड मारून हा व्यक्ती सामाजिक शांतता भंग करत असल्याचे प्रकार दोन वेळेस उघडकीला आले होते. परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा हा प्रकार पाहिल्यानंतर मनोरुग्ण हेमंत अविनाश जाधव हा उद्योग करत असल्याचे समोर आले.
बेगमपुरा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि घाटी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिलेल्या अहवालानंतर त्याला न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने हेमंत याला पुण्यातील मेंटल हॉस्पिटल येरवडा येथे उपचारासाठी दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी त्यांची येरवडाकडे रवानगी केली आहे