
महाराष्ट्र्रात अनेक धक्कादायक घटना गेल्या काही महिन्यांपासून उघडकीस येत आहेत अशातच औरंगाबाद इथे एक घटना उघडकीस आली असून पतीच्या खुनामागे चक्क पत्नीचाच हात असल्याचे आढळून आल्यावर पोलीस देखील चकित झाले आहेत. अनैतिक संबंधात पती अडथळा ठरत असल्याने पत्नीने आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीच्या हत्येसाठी सुपारी दिली होती.पोलिसांनी मृतक व्यक्तीच्या पत्नीसह इतर आरोपींना अटक केली आहे.रामचंद्र जायभाये या या दुर्दैवी पतीचे नाव आहे.
उपलब्ध माहितीनुसार, रामचंद्र जायभाये हे आपली पत्नी मनिषा आणि मुलासोबत औरंगाबादमध्ये राहत होते. रामचंद्र यांची पत्नी मनिषाचे तिच्या एका मित्रासोबत अनैतिक संबंध होते आणि याची रामचंद्र यांना मिळाली होती आणि त्यामुळे ते दारूच्या आहारी गेले तर दुसरीकडे मनीषा हिच्या वागण्यात काही बदल होत नव्हता. प्रियकरासोबत संबंध सुरु ठेवण्यासाठी मनीषाला तिच्या नवऱ्याचा अडथळा वाटत होता त्यामुळे तिने त्यांना मारण्यासाठी प्लॅन रचला.
20 ऑक्टोबर रोजी रात्री रामचंद्र हे घरात झोपलेले असताना मनिषाने आपला प्रियकर गणेश उर्फ समादान फरकाडे याला बोलवून घेतले. प्रियकर घरात दाखल होताच त्यांनी चाकूच्या सहाय्याने रामचंद्र यांची हत्या केली. हत्या केल्यावर त्यांनी रामचंद्र यांचा मृतदेह एका नाल्यात फेकला. पतीचा खून करण्यासाठी चक्क मनिषाने तिचे इतरही काही मित्र बोलावले होते आणि त्यांना एक लाखांची सुपारी देखील देण्यात आली होती.