औरंगाबाद हादरलं..शेजारच्या घरात आपल्या मुलीचा आवाज ऐकून आईने धाव घेतली अन ..

Spread the love

महाराष्ट्रात अनेक खळबळजनक घटना उघडकीला येत असताना अशीच एक घटना औरंगाबाद जिल्ह्यात उघडकीला आली असून ‘ शाम्पू आणून दे ‘ असे सांगून पाच वर्षे मुलीला घरात बोलावून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलेला आहे. अजिंठा गावातील इंदिरानगर झोपडपट्टी शुक्रवारी दुपारी ही घटना घडली आहे. सदर प्रकरणी अजिंठा पोलिसांनी 17 वर्षीय विधिसंघर्षग्रस्त मुलाला ताब्यात घेतले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, अजिंठा गावातील इंदिरा नगर झोपडपट्टी भागात आरोपीचे कुटुंबीय कामानिमित्त बाहेर गावी गेले होते त्यावेळी त्याने संधी साधून शेजारील चिमुरडीला आपल्या घरात बोलावले आणि शाम्पू आणून दे असे सांगितले.

तिने शाम्पू आणून दिल्यावर त्याने आतून घराची कडी लावली आणि तिच्यावर अत्याचार केला. मुलगी ओरडू लागली तेव्हा शेजारी राहणाऱ्या मुलीच्या आईला हा आवाज गेला आणि तिने दार ठोठावले मात्र आरोपी मागील दाराने पळून गेला. आसपासच्या नागरिकांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला त्यावेळी मुलगी घाबरलेल्या अवस्थेत होती त्यानंतर तिला दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे तर त्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


Spread the love