औरंगाबाद हादरले..’ नवस अखेर पूर्ण झाला ‘ म्हणत विवाहितेला पेढा खाणे पडले महागात

Spread the love

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असून अशीच एक घटना औरंगाबाद इथे उघडकीस आली असून एका विवाहित महिलेला चक्क माझा नवस पूर्ण झाला आहे असे सांगून एका तरुणाने पेढा खाऊ घातला आणि त्यातून तिला गुंगी आल्यावर तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला असे पीडित महिलेचे म्हणणे असून सदर तरुणाच्या विरोधात औरंगाबाद येथील वाळूज इथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . नितीन अशोक पतंगे (वय २३, रा.नर्सरी काॅलनी, रांजणगाव) असे आरोपीचे नाव असल्याचे समजते.

उपलब्ध माहितीनुसार , वाळूज औद्योगिक वसाहतीतील रांजणगाव (शेणपुंजी) येथे विवाहित महिला कुटुंबासह राहत असून ८ एप्रिल २०२१ रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास ही महिला घरी एकटी असतांना तिच्या पतीच्या ओळखीचा नितीन अशोक पतंगे (वय २३, रा.नर्सरी काॅलनी, रांजणगाव) हा महिलेच्या घरी आला आणि आमचा नवस पूर्ण झाला आहे म्हणून मी पेढे वाटत असल्याचे सांगत महिलेला पेढा खायला दिला .

आरोपीने दिलेला पेढा खाल्ल्यानंतर महिलेला गुंगी आल्याचे पाहून आरोपीने तिच्यावर अत्याचार केला आणि सदर प्रकाराचा त्याने व्हिडीओ काढला. महिलेने तिच्यासोबत झालेल्या या प्रकाराबद्दल आरोपीला जाब विचारला असताना त्याने अत्याचाराचा काढलेला व्हिडीओ दाखवून तू जर माझ्या सोबत राहिली नाही, माझ्या मर्जीप्रमाणे वागली नाही तर मी हा व्हिडीओ व्हायरल करेन आणि तुला व तुझ्या कुटुंबाला जीवे मारील, अशी धमकी दिली. आपल्यासोबत झालेल्या या प्रकाराने महिला घाबरून गेली आणि कुठे काही बोलली नाही मात्र त्यानंतर आरोपीने याचा फायदा घेत तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले.

नितीनकडून होणाऱ्या सततच्या अत्याचाराला महिला कंटाळून गेली आणि अखेर तिने तिच्या सोबत घडलेला सर्व प्रकार पतीला सांगितला. पतीने महिलेस समजावून घेत धीर दिल्यानंतर पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बांगर हे करीत आहेत.


Spread the love