औरंगाबाद हादरले..सासू म्हणते ‘ सुनबाई माझी भोळी ‘ म्हणून त्याने कपाशीच्या शेतात नेले

Spread the love

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून अनेक धक्कादायक घटना समोर येत असतानाच अशीच एक घटना औरंगाबाद इथे उघडकीस आली असून एका शेतात गेलेल्या एका महिलेवर ५० वर्षीय व्यक्तीने अत्याचार केला आहे. ३ नोव्हेंबर रोजी दुपारच्या दरम्यान घडली असून शेतात गायीला चारा टाकण्यासाठी गेलेल्या ३० वर्षीय महिलेवर आरोपीने कपाशीच्या शेतात नेऊन अत्याचार केला. घटना उघडकीस आल्यावर परिसरात खळबळ उडाली आहे .

उपलब्ध माहितीनुसार, संशयित आरोपी देविदास फुके (वय ५० ) याला एका तासाच्या आत अटक करण्यात आली आहे. देविदास हा गंगापूर तालुक्यातील धामोरी येथील रहिवासी असून पीडितेच्या सासूने वाळूज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

सासूने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिची सून भोळसर स्वभावाची असून ती बुधवारी गायीला चारा टाकण्यासाठी शेतात गेली होती. आरोपीने तिला कपाशीच्या शेताजवळ गाठले आणि शेतात चल म्हणत ओढू लागला. सून घाबरली आणि ओरडू लागली मात्र आरोपीने तिला कपाशीच्या शेतात नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. पोलिसांनी तातडीने देविदासवर गुन्हा दाखल करून त्याला १ तासाच्या आत अटक केली. ४ तारखेला त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने गुन्हेगाराला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.


Spread the love