‘ काहीतरी वेगळं ‘ करायच्या नादात म्हणाली माझ्यावर सामूहिक बलात्कार अन मग ..

Spread the love

महाराष्ट्रात एक विचित्रच घटना उघडकीस आली असून चक्क एका तरुणीने स्वतःवर सामूहिक बलात्कार झाल्याची कैफियत पोलीसांपुढे मांडली आणि पूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लावली मात्र पोलीस तपास सुरु असताना ही तक्रारच खोटी असल्याचे आढळून आले मात्र त्यामागचे सत्य ऐकून पोलिसही हैराण झाले. प्रियकराशी लग्न करण्यासाठी तरूणीने स्वःतवर सामूहिक बलात्कार झाल्याचा बनाव रचला. आता आपल्याशी कोणी लग्न करणार नाही आणि सहानभूती वाटून प्रियकर आपल्यासोबत लग्न करेल असा तिचा कयास होता म्हणून क्राईम पेट्रोल पाहून तिने हा बनाव रचला होता .

उपलब्ध माहितीनुसार, पीडित १९ वर्षीय तरूणी कळमेश्‍वर तालुक्यातील एका खेड्यात राहत असून तिच्या प्रियकराचे एक हॉटेल आहे. मुलीचे वडिल देखील त्याच हॉटेलवर काम करतात. ‘मुलीला संगीताची आवड असून तिला संगीत शिकायचे आहे.’ असे तिच्या वडिलाने हॉटेलमालक असलेल्या युवकाला सांगितले. युवकाने त्या मुलीला हॉटेलवर बोलावून घेतले आणि पुढील शिक्षणासाठी मदत केली म्हणून ही तरुणी त्याच्यावर फिदा झाली.

काही कालावधीत त्यांचे फोनवर बोलणे सुरु झाले मात्र युवकाच्या म्हणण्याप्रमाणे ती फक्त मैत्रीण आहे तर मुलीचे मात्र त्याच्यावर एकतर्फी प्रेम जडले. तरूणीला त्या युवकाशी लग्न करायचे होते मात्र सामाजिक आर्थिक अंतर आणि कुटुंबियाचा विरोध होणार यामुळे काहीतरी वेगळे केल्याशिवाय आपले लग्न होणार नाही, अशी खात्री तिला पटली आणि तिने पुढील सर्व प्लॅन केला.

टीव्हीवर क्राईम पेट्रोल पाहत असताना त्यात एक तरुणी स्वतःवर बलात्कार झाल्याचे नाट्य रचते आणि शेवटी तिच्या प्रियकराला सहानुभूती म्हणून दया येऊन लग्नास होकार देतो. मग आपण असेच करूया असे ठरवत तिने हा प्लॅन रचला. पोलीस ठाणे गाठत तिने गॅंगरेपचा गुन्हा दाखल केला. मात्र तपास सुरु असताना ती फक्त मोबाइलवर बोलत असून चांगली ठणठणीत फिरत असल्याचे देखील स्पष्ट झाले तसेच तिने केले इतर वर्णन देखील खोटेच आढळून आले. वैद्यकिय चाचणी केल्यानंतरही बलात्कार झाला नसल्याचे स्पष्ट झाले तरीही ती आपल्या म्हणण्यावर ठाम असल्याने पोलिसांनी तिला सीसीटीव्हीचे फुटेज दाखवल्यावर तिची बोलती बंद झाली अन तिने आपली चूक मान्य केली.


Spread the love