कुठे वाच्यता केली तर.., येरवडा पोलिसात पोहचले प्रकरण 

Spread the love

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचा विनयभंग तसेच तिच्यावर लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केल्याप्रकरणी येरवडा पोलिसात एका तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , नरेश अण्णा धनगर ( वय 26 राहणार ताडीवाला रस्ता ) असे संशयित आरोपीचे नाव असून आरोपी धनगर याने या मुलीशी मैत्री करून तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलेले होते. सातत्याने त्याने तिला विवाहाचे आमिष दाखवले आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला असे मुलीचे म्हणणे आहे . सदर प्रकाराची कुठे वाच्यता केली तर जिवे मारून टाकेल अशी देखील धमकी त्याने दिलेली होती मात्र अखेर मुलीने धीर एकवटतकुटुंबीयांना माहिती दिली आणि येरवडा पोलिसात हा गुन्हा दाखल करण्यात आला.


Spread the love