
कुत्र्यांच्या अनेक प्रजाती असतात त्यामध्ये लहान कुत्र्यापासून तर अजस्त्र मोठ्या साईजच्या कुत्र्यांपर्यंत अनेक वेगवेगळे प्रकार त्यामध्ये आढळून येतात. अनेक जणांना घरात कुत्रा पाळण्याची हौसदेखील आहे मात्र कुत्र्याची जात माहीत नसल्याने एका व्यक्तीवर भलताच प्रसंग ओढवलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, चीनमधील ही घटना असून एका कुटुंबाने दोन वर्षांपूर्वी पाळीव कुत्रा समजून एक प्राणी घरी आणलेला होता. कुत्र्याप्रमाणे त्याला त्यांनी खाऊ घातले आणि तो देखील कुत्र्याचे खाद्य खात वाढत चाललेला होता त्यानंतर त्याचा आहार हा कुत्र्याच्या तुलनेत खूपच जास्त असल्याचे त्यांच्या लक्षात आले सोबतच हा प्राणी दोन पायावर देखील चालत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना शंका आली म्हणून त्यांनी एका पशु वैद्यकीय डॉक्टरकडे त्याला घेऊन गेले त्यावेळी आपण पाळलेला पाळीव प्राणी हा कुत्रा नसून चक्क अस्वल असल्याचे त्यांच्या लक्षात आले. विशेष म्हणजे हे साधेसुधे अस्वल नव्हते तर नामशेष होणाऱ्या एका प्रजातीचे पिल्लू त्यांनी कुत्रा समजून आणलेले होते.
चीनच्या युयान प्रांतातील सु युन नावाच्या व्यक्तीने तिबेटियन मास्टिफ समजून 2016 मध्ये हे पिल्लू खरेदी केलेले होते. दोन वर्षात ते बरेच मोठे झाले आणि त्याचे वजन देखील सुमारे 114 किलोपर्यंत पोहोचले. त्याचा आहार देखील कुत्र्यांच्या तुलनेत मोठा होता तसेच दोन पायावर देखील चालण्याचे त्याचे कौशल्य एक्स्ट्रा ऑर्डीनरी होते मात्र त्यानंतर कुटुंबाला शंका आली त्यावेळी पाळलेला प्राणी हा आशियाई अस्वल असून तो नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याची देखील माहिती समोर आली त्यानंतर या अस्वलाला वन्यप्राणी बचाव केंद्रात नेण्यात आलेले असून तिथे त्याची देखरेख सुरू केलेली आहे.