कोपर्डी प्रकरणातील एका आरोपीची येरवड्यातील कारागृहात आत्महत्या

Spread the love

नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील निर्भयावरील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू बाबुलाल शिंदे याने कारागृहात आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. येरवडा कारागृहात तो जन्मठेपेची शिक्षा भोगत होता मात्र कारागृहातच त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असून याप्रकरणी पुढील तपास पोलिसांनी सुरु केला आहे. येरवड्यातील बराकीतच त्याने टोकाचे पाऊल उचलले.

महाराष्ट्रभर गाजलेल्या कोपर्डी बलात्कार व हत्या प्रकरणातील मुख्य दोषी पप्पू ऊर्फ जितेंद्र बाबूलाल शिंदे याला अत्याचार व खूनाच्या आरोपाखाली दोषी धरत नगर सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती तर अन्य संतोष गोरख भवाळ व नितीन गोपीनाथ भैलुमे यांचा या कटात सहभाग असल्याचे सिद्ध झाल्याने त्यांनाही न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती.

सदर निर्णयाविरोधात पप्पू शिंदेने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते आणि याप्रकरणी तो येरवडा कारागृहात फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी झालेली नसल्याने शिक्षा भोगत होता. इयत्ता नववीत शिकणाऱ्या १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा त्याच गावातील तीन नराधमांनी बाईकवरून पाठलाग केला होता आणि त्यानंतर निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केला आणि तिची अमानुष हत्या केली होती त्यानंतर संपूर्ण राज्यात आरोपींच्या शिक्षेसाठी मोर्चे देखील काढण्यात आलेले होते .


Spread the love