कोर्टाचा निकाल आपल्या बाजूने यावा म्हणून ‘ काळी बाहुली ‘ अन.., पुणे जिल्ह्यातील प्रकार

Spread the love

महाराष्ट्रात एक अजब असा प्रकार सध्या चर्चेत आलेला असून कोर्टात सुरू असलेल्या न्यायालयातील खटल्याचा निकाल आपल्या बाजूने लागावा यासाठी चक्क लिंबू , काळी बाहुली आणि अंडे गुलाल बुक्का पेपरमध्ये ठेवून पूजा घालण्याचा प्रकार महाराष्ट्राला दिशा देणाऱ्या पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी गावाजवळील वैदवाडी फाटा इथे समोर आलेला आहे . पारगाव पोलिसात सात जणांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , पंढरीनाथ विठोबा कसबे , रोहिणी पंढरीनाथ कसबे , वैभव पंढरीनाथ कसबे ( सर्वजण राहणार जारकरवाडी तालुका आंबेगाव ) यांच्यासोबत चार अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून जयश्री कचरदास कजबे यांनी यासंदर्भात फिर्याद दिलेली आहे.

जयश्री कजबे आणि त्यांचा दीर पंढरीनाथ कसबे यांच्या शेती संदर्भात सध्या न्यायालयात वाद सुरू आहे. या खटल्याचा निकाल पंढरीनाथ कसबे यांच्या बाजूने लागावा आणि जयश्री कसबे यांचे नुकसान व्हावे या उद्देशाने आरोपींनी चक्क काळ्या जादूचा वापर करत हा प्रकार केलेला होता. पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.


Spread the love