खून करून तुरुंग नको , पुण्यात डॉक्टराच्या अपहरणात ‘ वेगळाच ‘ ट्विस्ट

Spread the love

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून पतीपासून वेगळे राहत असणाऱ्या पत्नीने पतीला अद्दल घडवण्याच्या उद्देशाने जो काही कारनामा केला त्याची सध्या पुण्यात जोरदार चर्चा आहे मात्र महिलेचा हा कारनामा भलतीकडेच गेलेला असून त्यानंतर हे प्रकरण समोर आलेले आहे. आरोपी पत्नीने पतीचे अपहरण करून त्याच्या हत्येची सुपारी दिलेली होती मात्र सुपारी घेतलेल्या आरोपींनी पतिची हत्या न करता त्याला लुबाडलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार , लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वडकी परिसरात ही घटना घडलेली असून विभक्त राहणाऱ्या एका डॉक्टर पतीच्या हत्येची सुपारी त्याच्या पत्नीनेच दिलेली होती मात्र ज्यांनी सुपारी घेतली त्यांनी डोके चालवले आणि त्यांनी डॉक्टराचे अपहरण तर केले मात्र ठार मारण्याची धमकी देत त्याच्या घरात चोरी केलेली आहे . प्रदीप मारुती जाधव ( वय 48 ) यांनी यासंदर्भात पोलिसात तक्रार दिलेली असून दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

प्रदीप जाधव हे जनावरांचे डॉक्टर असून त्यांचा आणि पत्नीचा गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू असून सदर प्रकरण सध्या कोर्टात सुरू आहे. नऊ ऑगस्ट रोजी चारच्या सुमारास त्यांना वडकी गायकवाड रोड येथे एक कुत्रे आजारी पडलेले आहे तिथे तुम्ही या असे सांगण्यात आलेले होते म्हणून ते गेले त्यावेळी त्यांचे नंबर प्लेट नसणाऱ्या गाडीमधून अपहरण करण्यात आले आणि गाडीत बसून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

आरोपींनी त्यांच्या गळ्याला चाकू लावून आम्हाला तुझी सुपारी तुझी पत्नी आणि मेहुण्याने दिलेली आहे . आम्हाला वीस लाख रुपये दिले तर तुला सोडून देऊ असे सांगण्यात आले होते त्यानंतर प्रदीप जाधव यांनी आरोपींना घराच्या चाव्या दिल्या आणि आरोपींनी त्यांच्या घरातून दागिने आणि रोख रक्कम अशी 27 लाख रुपयांची चोरी केली त्यांची प्रदीप जाधव यांची सुटका झाल्यानंतर त्यांनी लोणी काळभोर पोलिसांना हा सर्व प्रकार सांगितलेला असून पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केलेला आहे.


Spread the love