
महाराष्ट्रात अनेक वेगवेगळ्या घटना समोर येत असताना अशीच एक घटना पंढरपूर येथे समोर आली असून आत्महत्या करण्याबाबत व्हाट्सअपवर मेसेज व्हायरल करून महावितरणचे एक अभियंता गायब झाले होते मात्र ते पुन्हा परत आले असून तीन इसमानी आपल्याला खंडणी मागितली आहे, अशी तक्रार त्यांनी पोलिसात दिली आहे.
महावितरणचे अधिकारी गणेश वगेरे व कर्मचारी राजेंद्र घोडके यांनी कोट्यावधींचा घोटाळा केला आहे असा एक तक्रार अर्ज पंढरपूर ग्रामीण 2 येथील महावितरण कार्यालयात नामदेव विश्वनाथ खेडेकर यांनी दिला होता. या अर्जाची चौकशी करण्यासाठी महावितरण कार्यकारी अभियंता यांनी एक समिती नेमली होती त्या समितीने अर्जाची चौकशी करून त्यात तथ्य नसल्याचे लेखी कळवले होते.
नामदेव खेडेकर यांनी वीज कनेक्शन बिल वेळेवर न भरल्याने त्यांचा वीजपुरवठा राजेंद्र घोडके यांनी खंडित केला होता त्यातून खेडेकर यांच्या मनात घोडके आणि गणेश वगेरे यांच्या विरोधात राग निर्माण झाला म्हणून खेडेकर हे दोघांच्या विरोधात वारंवार खोट्या तक्रारी करत होते. सदर तक्रारी या पंढरपूर येथील काही वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्यामुळे महावितरणच्या अधिकार्यांना भीती वाटू लागली आणि ते रहस्यमयरित्या गायब झाले होते.
गणेश वगेरे यांच्या म्हणण्यानुसार वर्तमानपत्रातील बातम्या आणि तुमची बदनामी थांबवायची असेल तर हे व्यक्ती आपल्याला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पैशाची मागणी करत तसेच तुमच्या विरोधात इतर गावातूनही तक्रारीचे ठराव आलेले आहे असे म्हणून आपल्याला पैशासाठी घाबरवत होते. तडजोड करण्यासाठी तुम्ही पंढरपूरमध्ये येऊन भेटा अशा स्वरूपाचे व्हाट्सअप वर मेसेज देखील करत होते त्यानंतर आपण गायब झालो होतो मात्र आता पुन्हा हजर होऊन आपण नामदेव विश्वनाथ खेडेकर, महालिंग दुधाळे, बंडू साळुंखे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत आहोत, असे म्हटले आहे