
पहिल्यांदा घरी चोरी झाली म्हणून दुसऱ्यांदा चार लाख रुपयांचे दागिने पर्समध्ये घेऊन फिरणाऱ्या महिलेची दुसऱ्यांदा चोरी झाल्याची एक घटना सोलापूर येथे उघडकीला आली असून सोलापूर येथील रमा क्लिनिकमधील 10 फेब्रुवारी रोजी सकाळी हा प्रकार घडलेला आहे. सदर बाजार पोलिसांनी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
साधना गणेश गायकवाड ( वय 45 राहणार झोपडपट्टी नंबर एक) यांच्या घरात काही महिन्यांपूर्वी चोरी झाली होती. त्यामुळे त्या आपले दागिने घरात ठेवत नव्हत्या तर सतत पर्समध्ये घेऊन जात असायच्या. नऊ फेब्रुवारी रोजी रात्रपाळी असल्याने त्या तब्बल चार लाख रुपयांचे दागिने पर्समध्ये घेऊन रमा क्लिनिक येथे कामाला गेल्या होत्या.
काम करत असताना त्यांनी पर्स क्लिनिकमधील कपाटात ठेवली होती मात्र रात्र पाळी झाल्यावर दहा फेब्रुवारी रोजी सकाळी पर्स बाहेर काढली असताना पर्समधील दागिने देखील गायब झाल्याचे लक्षात आले त्यानंतर पोलिस ठाण्यात धाव घेऊन त्यांनी या विषयी तक्रार दिली आहे.