चक्क प्रेयसीसाठी दिले स्वतःचे लिव्हर , तरुण म्हणतोय की..

Spread the love

प्रेमासाठी लोक काहीही करण्याची तयारी दाखवतात असेच एक प्रकरण सध्या समोर आलेले असून पाकिस्तान येथील या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. सदर प्रेमप्रकरणात एका प्रियकराने आपल्या प्रेयसीला लिव्हर दिलेले असून त्यांची ही अजब प्रेम कहाणी सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

पाकिस्तानी युट्यूबर सय्यद बासीत आली यांनी या जोडप्याशी संवाद साधला होता. सदर घटना पाकिस्तानमधील लाहोर येथील असून त्यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओनंतर नेटकरी देखील भाऊक झालेले पाहायला मिळाले. सय्यद बासीत आली हे वेगवेगळ्या पद्धतीच्या लव्ह स्टोरी आपल्या चॅनेलवर शेअर करत असतात परिसरातील अनेक विवाहांची ते माहिती घेतात आणि त्यांची मुलाखत घेऊन आपल्या चॅनलवर ते प्रसारित करत असतात.

सदर प्रेमप्रकरणातील मुलाचे नाव शहजाद असे असून त्याच्या गर्लफ्रेंडचे नाव नयना असे असल्याचे समजते. दोघेही एकत्र शिकले आणि सध्या एकाच कंपनीत काम करत आहेत. बराच काळ ते एकमेकांच्या प्रेमात होते आणि त्यांना लग्नही करायचे होते मात्र दरम्यानच्या काळात प्रेयसीची तब्येत बिघडली आणि तिच्या लिव्हरमध्ये प्रॉब्लेम असल्याचे समजले त्यानंतर या समस्येचे निराकरण न झाल्यास तिचा जीव देखील जाऊ शकतो असे डॉक्टरांनी सांगितले होते त्यानंतर शहजाद यांनी तिला लिव्हर देण्याचा निर्णय घेतला असेदेखील त्यांनी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. पाकिस्तानमध्ये या अनोख्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू असल्याचे समजते.


Spread the love