
बाटलीबंद पाण्याचा ब्रँड बिसलरी हा उद्योग सांभाळण्यास चक्क कोणी नसल्याने विक्रीस काढण्यात आलेला आहे. बाटलीबंद पाण्याच्या युगाची सुरुवात करणारा हा ब्रँड चक्क बाटलीबंद पाण्याची ओळखच बनलेला आहे. बिसलरी इंटरनॅशनलचे संस्थापक रमेश चौहान यांनी कंपनी विकण्याचा निर्णय घेतलेला असून त्यांची मुलगी हा व्यवसाय सांभाळण्यास तयार नसल्याने सध्या बिसलरी खरेदीसाठी त्यांची अनेक कंपन्यासोबत चर्चा सुरू आहे.
सुमारे सात हजार कोटी रुपये घेऊन बिसलरी कंपनी टाटाला विक्री केल्याची चर्चा सुरू झाली होती मात्र अद्यापपर्यंत त्यांच्यामध्ये व्यवहार झालेला नाही. रमेश चौहान यांनी, होय आम्ही कंपनीची विक्री करत आहोत. टाटा सोबतच इतरही कंपन्यांची आमची चर्चा सुरू आहे मात्र अद्याप आम्ही कुठल्याही निर्णयापर्यंत आलेलो नाही ‘ असे सांगत त्यांनी कंपनी कुणाला तरी सांभाळावी लागेल असे म्हटले आहे. रमेश चव्हाण असून 82 वर्षीय असून त्यांच्या मुलीने ही कंपनी सांभाळण्यास नकार दिलेला आहे.
1965 मध्ये सर्वप्रथम ही कंपनी सुरू करण्यात आली होती . इटलीचे संशोधक बिसलरी हेली फेलीस बिसलरी यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक सहकार्य घेत ही कंपनी सुरू करण्यात आल्यानंतर रमेश चौहान यांनी त्यांचेच नाव आपल्या ब्रँडला दिले होते. चौहान यांनी तीन दशकांपूर्वी थम्स अप, गोल्ड स्पॉट, माझा, लिम्का या ब्रँची देखील कोकाकोला विक्री केली होती. कोकाकोला कंपनीने भारतात पाऊल ठेवले त्यावेळी त्यांना भारतात नामांकित असे ब्रँड विकत घेण्याची इच्छा झाली त्यावेळी देखील चौहान यांनी त्यांचे त्या काळात सर्वाधिक नामांकित असलेले ब्रँड या कंपनीला विकले होते.