चार दिवस रेल्वे स्टेशनवर ‘ ती ‘ रडत होती, शिवसेना महिला कार्यकर्तीने लक्ष घातले अन..

Spread the love

एक खळबळजनक घटना जळगाव जिल्ह्यात समोर आलेली असून लग्नाला पाच ते सहा वर्षे झाली तरीदेखील मूलबाळ होत नसल्याने सासरच्या मंडळीकडून महिलेला वांझोटी म्हणून हिणवण्यात आले आणि पुत्रप्राप्तीसाठी म्हणून ती अंधश्रद्धेला बळी पडली त्यानंतर एका भगताच्या ती संपर्कात आली आणि या भगताने तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले त्यानंतर ती गर्भवती राहिल्यावर अर्ध्यातच जबाबदारी झटकून त्याने हात वर केले. अशा परिस्थितीत शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्याने या महिलेला आधार दिला आणि तिचे आयुष्य बरबाद होण्यापासून वाचवले आहे.

दैनिक लोकमतने या संदर्भात वृत्त दिले असून, अमळनेर तालुक्यातील 23 वर्षांच्या तरुणीला लग्न होऊन पाच-सहा वर्षे उलटली तरी मूलबाळ होत नसल्याने सासरच्या मंडळीकडून तिला वेळोवेळी टोमणे मारण्यात येत होते त्यावेळी उपाय शोधत असताना तिला परिचयातील एक भगत भेटला आणि त्यानंतर त्याच्या गोड बोलण्याला ती बळी पडली आणि तिने त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सुरू केले.

भगत याने या तरुणीसाठी आपली बायको आणि मुले यांचा त्याग केला आणि काही दिवस तिच्यासोबत तो राहू लागला. सातत्याने तो या तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवत होता त्यातून तिला गर्भधारणा झाली आणि त्यानंतर या भगताने तिला तिच्या गावात आणून सोडले आणि पलायन केले. सासरच्या मंडळींनी आधीच तिच्यापासून संपर्क तोडला होता तर माहेरी आल्यावर भावाने देखील जबाबदारी झटकली.

पीडित महिलेने आईकडे विनवणी केली मात्र आईने तिला गर्भपात करून घे असा सल्ला दिला आणि तरुणीची मात्र बाळाचा जीव घेण्याची तयारी नव्हती त्यामुळे अशा विवंचनेत ती अमळनेर येथे रेल्वे स्टेशनवर चार दिवस रडत होती. कुठलाच आसरा राहिला नाही म्हणून जीवाचे बरे वाईट करण्याच्या उद्देशाने ती विचार करत होती याच दरम्यान शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या सुनिता जयराम माने यांनी या प्रकरणात लक्ष घातले आणि बहुउद्देशीय संस्थेत या तरुणीची पाठवणी केली.


Spread the love