चालकाच्या गियर बदलण्यावर उच्चभ्रू महिला फिदा , ड्रायव्हरसोबत थाटला संसार

Spread the love

सोशल मीडियावर सध्या एका प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून जाती-धर्माच्या पलीकडे जात आणि श्रीमंत गरीब याच्या पलीकडे जात हा विवाह पार पडलेला आहे. पाकिस्तान येथील ही घटना असून एका श्रीमंत कुटुंबातील मुलीला ड्रायव्हिंग यावी म्हणून क्लास लावण्यात आलेला होता त्यावेळी शिकवत असलेल्या ड्रायव्हरच्या प्रेमात ती पडली आणि त्यांनी दोघांनी लग्न केले. आपल्याला आपल्या पतीची गिअर बदलण्याची स्टाईल सर्वाधिक जास्त आवडली म्हणून आपण त्याच्या प्रेमात पडलो असे या तरुणीचे म्हणणे आहे.

डेली पाकिस्तान नावाच्या एका युट्युब चॅनेलने त्यांची मुलाखत घेतली असून या मुलाखतीत ही तरुणी म्हणते की, ‘ आधी ड्रायव्हर असलेल्या तिचा नवरा तिला गाडी शिकवायला घेऊन जायचा त्यावेळी गाडी शिकवत असताना त्याची गिअर बदलण्याची स्टाईल मला सर्वाधिक जास्त आवडली. ज्या पद्धतीने तो गिअर बदलायचा ही त्याची स्टाईल मला सर्वाधिक भावली आणि म्हणून आपण त्याच्या प्रेमात पडलो.

मुलाखतकार यांनी तिला तुला तुझ्या पतीसाठी कोणते गाणे गायचे आहे असे विचारले त्यावेळी तिने ‘ हम तुम एक कमरे में बंद हो और चावी गुम हो जाये ‘ या हिंदी गाण्याचे नाव घेतले तसेच गाण्याच्या काही ओळी देखील तिने म्हणून दाखवल्या. त्यावेळी मुलाखतकार यांनी तिला चावी कहा है असे म्हटल्यानंतर तिचा नवरा देखील हसला आणि म्हणाला की आता गाडी देखील गायब आहे.


Spread the love