जमीन एमआयडीसीत गेली, कर्जही मिळेना अन मुलगीही मिळेना अखेर ..

Spread the love

महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना समोर आलेली असून औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथे एमआयडीसीसाठी संपादीत करण्यात आलेल्या जागेचा मावेजा मिळेना आणि जमीन संपादित असल्याने कर्ज ही मिळेना यामुळे आर्थिक नैराश्यात गेलेल्या एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सदर घटना जरूळ येथे उघडकीला आली असून गणेश भाऊसाहेब राऊत ( वय 28 ) असे मयत तरुणाचे नाव आहे

गणेशची जमीन एमआयडीसीसाठी संपादित करण्यात आली होती त्यामुळे वाढीव मावेजा मिळावा अशी त्यांची मागणी होती मात्र मावेजा मिळत नाही तसेच जमीन संपादित असल्याने कर्जही मिळत नाही. पीक विम्याचा लाभ घेता येत नाही तसेच किसान सन्मान योजनेचे देखील पैसे मिळत नाहीत अशा पद्धतीने ते आर्थिक नैराश्यात सापडले होते.

एकीकडे अशा स्वरूपाचे आर्थिक संकट तर दुसरीकडे आर्थिक अडचणीमुळे लग्न देखील जमत नव्हते त्यामुळे गणेश यांनी सोमवारी रात्री निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीला आला त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांचा मृतदेह नातेवाइकांकडे देण्यात आला. वैजापूर पोलिस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.


Spread the love