‘ जर तुम्ही बाळासाहेबांचे नातू असाल तर..’ , काय म्हणाले दीपक केसरकर ?

Spread the love

शिवसेनेतील बंड केलेल्या नेत्यांना गद्दार म्हटल्याबद्दल शिंदे गटाचे आमदार असलेले दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार प्रहार केलेला असून उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मात्र भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार दीपक केसरकर यांनी ‘ तुम्ही बाळासाहेबांचे नातू आहात त्यामुळे कसे बोलावे हे तुम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडून शिका संजय राऊत यांच्याकडून नाही ‘ असेही ते म्हणाले आहे.

शिर्डी येथे दीपक केसरकर हे गुरुवारी संध्याकाळी आले होते त्यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. दीपक केसरकर यावेळी बोलताना म्हणाले की ‘ किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांचा माफिया म्हणून केलेला उल्लेख हा आक्षेपार्ह आहे. उद्धव ठाकरे हे आमचे नेते आहेत. किरीट सोमय्या जे बोलले ते चुकीचे आहे याबाबत आम्ही फडणवीस यांना सांगितलेले आहे. भाजप आणि आम्ही यांनी उद्धव ठाकरे यांच्या बद्दल काही वाईट बोलायचे नाही असे ठरवले आहे .’

दीपक केसरकर पुढे म्हणाले की, ‘ आदित्य ठाकरे खूप लहान आहे. गद्दार तुम्ही कोणाला म्हणतात. जर तुम्ही बाळासाहेबांचे नातू असाल तर असा शब्द तुमच्या तोंडात येताना दहा वेळा तुम्ही विचार करायला हवा. आम्ही देखील खूप काही बोलू शकतो मात्र आम्ही बोलणार नाही. आदित्य ठाकरे यांच्यापेक्षा मी दुप्पट वयाचा आहे मात्र तरीदेखील आदित्य ठाकरे समोर येतात तेव्हा उठून उभा राहतो कारण तो मान त्यांचा नाही तर उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा आहे.

भविष्यात जर एकत्र यायचे असेल तर एकमेकांच्या विरोधात अशी वक्तव्य करून मने दुखवायला नको. आधी जखम करायची आणि त्यानंतर मलम लावायचा यापेक्षा जखमच करू नका. आधी एकनाथ शिंदे यांना गटनेता पदावरून काढले आणि त्यानंतर माणसे भेटण्यास पाठवली . भावना गवळी यांच्या बाबतीत देखील असेच झाले असे देखील ते पुढे म्हणाले.


Spread the love