
सोशल मीडियात कधी काय चर्चेचा विषय होईल याचा काही नेम राहिलेला नाही. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत असून हा व्हिडीओ पाहिल्यावर आपल्याला देखील हसू आवरता येणार नाही . व्हिडिओमध्ये सदर तरुणी ही साधेसुधे नव्हे तर चक्क फायर पान खात आहे आणि याच वेळी तिच्या शेजारी जो माणूस आहे तो घाबरून गेला अन त्याचे भन्नाट एक्सप्रेशन्स कॅमेरामध्ये कैद झाले.
जर तुम्ही पान खाण्याचे शौकीन असाल तर तुम्ही विविध प्रकारचे पान ट्राय केले असतील. आइस पान, कधी चॉकलेट पान मात्र फायर पान तुम्ही कधी खाल्ले नसेल.फायर पान खाण्याची प्रत्येकाची हिम्मत होत नाही अनेकजण हे पान खाण्यास देखील घाबरतात कारण यात खरोखरच फायर असते. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की पिवळ्या रंगाचा ड्रेस घातलेली एक तरुणी फायर पान खाण्यासाठी दुकानात जाते.
तिथे दुकानात एक व्यक्ती आधीपासूनच उभा असून तरुणीने फायर पान खाण्यासाठी जसं तोंड उघडलं तस तो घाबरून गेला. तरुणीपेक्षा त्या शेजारील व्यक्तीचे हावभावच भन्नाट आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून हा व्हिडीओ इंस्टाग्राम (Instagram) वरील official_viralclips नावाच्या युजरने शेअर केला आहे.