‘ तिच्यामुळेच बरकत ‘, विवाहित वकील महाशयाने पक्षकारासोबतच थाटला संसार

Spread the love

एक अत्यंत वेगळीच घटना जळगाव जिल्ह्यात समोर आली असून पक्षकार म्हणून आलेल्या एका महिलेसोबत चक्क वकील महाशयांचे प्रेमप्रकरण सुरू झाले. सुरुवातीला पक्षकार आहेत म्हणून वकिलांच्या बायकोने देखील त्यांच्या संभाषणाकडे दुर्लक्ष केले मात्र काही कालावधीतच त्यांना हे प्रकरण भलतेच असल्याचे लक्षात आले मात्र तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती. वकील आणि त्यांचे पक्षकार यांच्यातील प्रेम प्रकरण इतके वेगाने बहरले की या वकिलाने बायको आणि मुलाला सोडून चक्क या पक्षकारासोबतच संसार थाटला. पक्षकार असलेली ही महिला हिला आधीचे एक मूल असून या वकिलाने चक्क त्या मुलाचा स्वीकार करून तिच्यासोबत दुसरा संसार थाटलेला आहे तर पहिली पत्नीही न्यायालयाचे उंबरठे झिजवत आहे.

दैनिक लोकमतने याबद्दल वृत्त दिलेले आहे. जळगाव जिल्ह्यातील एका तालुक्यात ही घटना उघडकीला आली असून वकिली करणार्‍या व्यक्तीला सात वर्षाचा मुलगा आहे हे मात्र दीड वर्षांपूर्वी त्याने पक्षकार असलेल्या या महिलेसोबत संसार थाटला. आपले राहते घर देखील या वकिलाने बायकोला दिलेले असून त्याची दुसरी बायको आणि तिचा मुलगा यांना घेऊन हा वकील सध्या भाड्याच्या घरात राहत आहे.

पहिली बायको ही घरकाम करणारी असून वकील महाशयांनी हात वर केल्यावर या महिलेवर चक्क उपासमारीची वेळ आलेली आहे मात्र वकील महाशय तिच्याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाही. पक्षकाराचा नाद सोडून निदान आता तरी आमच्याकडे लक्ष द्या या आशेने अनेकदा या महिलेने पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला कक्षात देखील धाव घेतली होती मात्र वकीलच बायकोसोबत राहायला तयार नाही. ‘ तुला कायद्याने काय करता येईल ते कर ‘ असे सांगत असल्याने महिला हतबल झालेली आहे.

वकील स्वतः कायदेपंडित असल्याने बायकोने माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा मात्र मी माझी दुसरी बायको सोडू शकत नाही. तिलादेखील एक मूल आहे, त्या मुलासकट आपण तिला स्वीकारलेले आहे त्यामुळेच आपल्या आयुष्यात आपल्याला बरकत आलेली आहे, असेदेखील हे वकील महाशय सांगत आहेत. जर आपला नवराच आपला राहिला नाही तर त्याला निदान कठोरात कठोर शिक्षा करा अशी पहिल्या बायकोची मागणी असून सदर प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


Spread the love