तीस हजार महिना अन घरात सात कोटी , टीव्हीची किंमत ऐकाल तर ..

Spread the love

देशात प्रचंड लाचखोरीचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून एक अत्यंत मोठे प्रकरण सध्या मध्यप्रदेशात समोर आलेले आहे. ना खाऊंगा ना खाने दूंगा याची पूर्णपणे पोलखोल यामुळे झालेली असून सरकारी महिला अधिकाऱ्याच्या घरी प्रचंड मोठ्या प्रमाणात घबाड आढळून आलेले आहे. पोलीस हाऊसिंग कारपोरेशनमध्ये कार्यरत असलेल्या सबइंजिनियर महिलेच्या घरात कोट्यावधी रुपयांची बेकायदेशीर संपत्ती सापडलेली असून मागील तेरा वर्षाच्या कालावधीत तिच्या पगाराचा हिशोब काढला तर फार फार तर तिने 15 ते 20 लाखांची कमाई केली असल्याचा अंदाज होता मात्र तिच्या घरातील संपत्ती पाहून लोकायुक्त विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील धक्का बसलेला आहे. छापेमारी केली तेव्हा पहिल्याच दिवशी तिच्या घरात कमाईपेक्षा तब्बल 232% अधिक संपत्ती आढळून आलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, हेमा मीना असे या महिला अधिकाऱ्याचे नाव असून भोपाळजवळच्या बिलखेरीया इथे लोकायुक्त विभागाने तिचे फार्म हाऊस आणि ऑफिसवर छापेमारी केलेली होती . तिच्याकडे मिळालेल्या संपत्तीचे मोजमाप करण्यासाठी काही दिवस लागतील अशी शक्यता व्यक्त करण्यात आलेली असून पहिल्याच दिवशी सात कोटी रुपयांची संपत्ती आढळून आलेली आहे.

तीस हजार रुपये पगार असणाऱ्या मासिक पगार असणाऱ्या हेमा हिच्या घरात तब्बल तीस लाखांचा टीव्ही आढळून आलेला असून 100 पेक्षा अधिक लोखंडी पिंजरे आढळून आले त्यामध्ये देश विदेशातून आणलेले 100 वेगवेगळ्या प्रजातीचे कुत्रे आढळून आलेले आहेत. त्यांना चपाती खाऊ घालण्यासाठी दीड लाख रुपयांचे चपाती बनवण्याचे मशीनदेखील तिथे आढळून आले. बंगल्यामध्ये अनेक गाड्या आढळून आलेल्या आहेत.

बंगल्यातील कर्मचारी एकमेकांसोबत बोलण्यासाठी चक्क वॉकी टॉकीचा वापर करायचे. तिचा हा बंगला वीस हजार स्क्वेअर फुट जमिनीवर बनवलेला असून तिने स्वतःच्या तसेच कुटुंबीयांच्या नावाने भोपाळ राईसेन परिसरात अनेक जमिनी विकत घेतलेल्या आहेत . हेमा ही शेतकरी कुटुंबात जन्माला आलेली असून तिचे वडील आजही शेती करतात. पूर्वजांकडून आलेली थोडी जमीन त्यांच्या नावावर होती त्याच्या जीवावर हेमा हिचे शिक्षण वडिलांनी पूर्ण केले त्यानंतर तिला सरकारी नोकरी लागली आणि तिचे दिवस बदलले.

इंजिनीयर झाल्यानंतर तिने स्वतःच्या तसेच वडिलांच्या नावाने हजारो एकर जमीन विकत घेतलेली असून तिच्याकडे हा पैसा कुठून आणि कसा आला हे अद्यापपर्यंत स्पष्ट झालेले नाही . 2016 पासून ती पोलीस हाऊसिंग कारपोरेशनमध्ये ती कार्यरत असून तिच्या एकत्रित संपत्तीचा अहवाल अद्यापपर्यंत समोर येणे बाकी आहे.


Spread the love