‘ ती भावच देईना ‘ म्हणून तिच्यावर चाकूने हल्ला केला , तिची प्रकृती उत्तम मात्र त्याचे ?

Spread the love

महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना समोर आलेली असून नागपूर जिल्ह्यातील भिवापूर येथे शेजारी राहणाऱ्या महिलेवर चाकूने हल्ला केल्यानंतर फरार झालेल्या आरोपीने सोमवारी सकाळी परिसरातील शोध घेत असलेल्या मुलासमोरच विष घेतल्याची धक्कादायक घटना घडलेली असून भारत चेतू अंडेलकर ( वय 45 राहणार दिग्रोला , तालुका भिवापूर ) असे मयत व्यक्तीचे नाव असल्याचे समजते.

उपलब्ध माहितीनुसार, भारत हा गेल्या काही दिवसांपासून घरानजीक राहणाऱ्या एका महिलेशी लगट निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता मात्र ती प्रतिसाद देत नाही हे पाहून त्याने रविवारी अकरा वाजता त्या महिलेवर चाकूने हल्ला केला आणि तिला गंभीर केले आणि आणि त्यानंतर तो फरार झाला. रात्रभर पोलिस आणि नागरिक त्याचा शोध घेत होते मात्र तो सापडला नाही.

त्याचा मुलगा याला तो चुलत भावाच्या शेतातील एका गोठ्यात लपला असल्याची माहिती मिळताच मुलाने तिकडे धाव घेतली मात्र मुलगा समजवण्याचा प्रयत्न करत असताना आता आपल्याला पोलीस पकडतील आणि आणि नातेवाईक काय म्हणतील या भीतीने त्याने मिरचीवर फवारणी करण्याचे औषध प्राशन केले. अवघ्या काही मिनिटात पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्याला रुग्णालयात दाखल केले मात्र तत्पुर्वी त्याचा मृत्यू झालेला होता.

आरोपी भारत याने 1993 मध्ये अशाच पद्धतीने आपल्या पहिल्या पत्नीवर देखील चाकूने हल्ला केला होता त्यानंतर भारतने तिला सोडून दुसरे लग्न केले होते आणि त्याच्या पत्नीने देखील दुसरे लग्न केले होते. हल्ल्यात जखमी झालेल्या भारतच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेवर नागपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती सुधारत असल्याचे समजते .


Spread the love