
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून नवी मुंबईतील कामोठे परिसरात डॉक्टर असलेल्या एका महिलेवर दोन वर्षांपासून अत्याचार करून तिला तब्बल 37 लाख रुपयांना फसवण्याचा प्रकार समोर आलेला आहे. सदर कालावधीत आरोपीने आपल्याकडून 14 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने काढून घेतले आणि 30 लाख रुपये रोख घेतले असे देखील म्हटलेले आहे. कामोठे पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी या महिला डॉक्टरची आरोपीसोबत ओळख झालेली होती. डॉक्टर महिला आणि त्यांच्या पतीचे वाद सुरू असल्याने या भामट्याने महिलेला लग्नाचे आमिष दाखवले आणि मी तुझ्यासाठी माझ्या पत्नीला घटस्पोट देईल असे देखील सांगितले. लग्नाच्या आधीच सदर व्यक्तीने या महिलेवर अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी लॉजवर घेऊन जात अत्याचार केले आणि आणि त्याचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिला पैशासाठी त्रास देणे सुरू केले.
दोन वर्षाच्या कालावधीत आरोपीने फिर्यादी महिलेकडून 14 तोळे सोन्याचे दागिने आणि तब्बल 30 लाख रुपये रोख स्वरूपात काढून घेतले. आरोपी पुरुष हा मूळचा पेण तालुक्यातील राहणारा असून कामोठे परिसरात तो सद्यपरिस्थितीत राहतो. डॉक्टर महिला आणि आरोपी एकाच परिसरात राहणारे असल्याने त्यांची ओळख झालेली होती मात्र आरोपीने त्याचा गैरफायदा घेत आपल्यावर अनेकदा अत्याचार केले आणि आपली आर्थिक फसवणूक देखील केली असे पीडितेचे म्हणणे आहे.